61 वा मराठवाडा मुक्तीदिन मोठ्या साजरा

September 17, 2009 12:32 PM0 commentsViews: 10

17 सप्टेंबर 61वा हैद्राबाद मुक्ती संंग्राम आणि मराठवाडा मुक्ती दिन संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबादेमधील सिध्दार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहण केलं. यावेळी स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. मुक्ती संंग्राम साठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या मुक्ती संग्रामातल्या सगळ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

close