गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा

February 17, 2015 1:20 PM0 commentsViews:

govind pansare_645617 फेब्रुवारी : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय. सोमवारी सकाळी पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्यांना कोल्हापूरमधल्या ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

सोमवारी दिवसभरात त्यांच्यावर 3 शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांचीही प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पानसरे यांच्या छातीत डाव्या बाजूला घुसलेली गोळीही काढण्यात आलीय. तसंच आज सकाळी पानसरे यांनी आपल्या नातेवाईकांना ओळखल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये सर्वसमावेशक मोर्चाचं आयोजन केलं असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close