आबांना अखेरचा निरोप

February 17, 2015 5:32 PM0 commentsViews:

महाराष्ट्राचे लाडके आबा…आर.आर.पाटील यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. आबांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मभूमी अंजनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आबांच्या तिन्ही मुलांनी पार्थिवाला अग्नी दिला. पोलिसांनी बंदुकीच्या फैर्‍या झाडून आबांना अखेरची सलामी दिली. ‘अमर रहे अमर रहे’ आर.आर.पाटील अमर रहे’ च्या घोषणांनी हेलिपॅड मैदान भावपूर्ण झालं. राजकीय नेते, लाखो गावकरी आणि अवघ्या महाराष्ट्राने आज या आपल्या लाडक्या आबांना साश्रू नयनाने अखेरचा निरोप दिला.++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close