गुहागरची जागा भाजपचीच- नितीन गडकरी

September 17, 2009 12:38 PM0 commentsViews: 1

17 सप्टेंबरगुहागरवर अजूनही भाजपचाच दावा असल्याचं नितीन गडकरीं यांनी सांगितलं आहे. गुहागरच्या जागेवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण गुहागरच्या जागेवरचा भाजपचा दावा अजूनही कायम आहे. गुहागरची जागा रामदास कदम यांच्यासाठी शिवसेनेला सोडल्यामुळं भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते. त्यामुळे रत्नागिरी भाजपाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले होते. तर सिंधुदुर्गमधल्या भाजपाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी, प्रदेश कार्यालयाकडे राजीनामे पाठवले. तसंच जिल्हा कार्यकारणीनीही राजीनामा दिला. निर्णय बदलला नाहीतर रामदास कदमांना मदत करणार नाही. असा इशाराही भाजप पदाधिकार्‍यांनी दिला होता. या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुंबईत नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर आपलं समाधान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

close