सिरीयल किलर रविंद्र कंट्रोले दोषमुक्त

September 17, 2009 1:37 PM0 commentsViews: 6

17 सप्टेंबर सिरीयल किलर म्हणून अटक करण्यात आलेल्या रविंद्र कंट्रोलेला दोषमुक्त करण्यात आलं आहे. मुंबई हायकोर्टाने त्याची मुक्तता केली. दक्षिण मुंबईत काही वर्षांपूर्वी सात हत्या करण्यात आल्या होत्या. यातल्या तीन गुन्ह्यात कंट्रोलेला अटक करण्यात आली होती. स्पेशल आणि फास्ट कोर्टात याआधी सुनावणी झाली होती. एका प्रकरणात रवींद्र कंट्रोलेला मोठी शिक्षा सुनावण्यात आली होती. मरीन ड्राईव्ह ,आझाद मैदानमध्ये झालेल्या खूनप्रकऱणी त्याची नार्को टेस्टही करण्यात आली होती.

close