प्ले बॅक सिंगर्ससाठी मंगेशकर कुटुंब एकत्र

September 17, 2009 2:02 PM0 commentsViews: 5

17 सप्टेंबर प्ले बॅक सिंगर्सवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांनी एकत्र यायाचं ठरवलंय आहे. त्यासाठी त्यांनी परफॉर्मर्स सिन्डिकेट नावाची कंपनी स्थापन केली आहे. प्ले बॅक सिंगर्सना रॉयल्टी मिळावी म्हणून हा लढा देण्याचं त्यांनी ठरवलंय. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे एक निवेदन सादर करण्यात आलं आहे. मंगेशकर कुटुंबाला 30 गायक -गायिकांची साथ मिळाली. सुरेश वाडकर, सुखवंदर सिंग, कुमार सानू, कुणाल गांजावाला अशा प्रसिद्ध गायक -गायिका या लढ्यात सामील झाले आहेत. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनाही अजून अनेक गाण्यांची रॉयल्टी मिळणं बाकी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close