घारापुरीजवळ फेरीबोटीला अपघात, 78 प्रवाशांची सुखरूप सुटका

February 17, 2015 7:45 PM0 commentsViews:

gharapuri3317 फेब्रुवारी : मुंबईजवळील घारापुरी बेटाजवळ एका फेरीबोटीला झालेल्या अपघातातून सर्व 78 प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोस्टगार्डने वेळीच बचाव मोहिम राबवून सर्व 78 प्रवाशांना सुखरूप वाचवलं.

घारापुरीजवळील एलिफंटा बेटावरून नवरंग नावाची फेरीबोट 78 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली होती. बेटावरून काही अंतर पार केल्यानंतर या बोटीला अपघात झाला. मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून तीन ते चार मैल सागरी अंतरावरही बोट अडकली होती.  कोस्टगार्डने युद्धपातळीवर हालचाली करून सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवलं. बेलापूरच्या तळावरून कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या साह्यानं बचाव मोहीम राबवली. तब्बल 20 मिनिट चाललेल्या या मोहिमेत सर्व प्रवाशांना बेलापूरच्या तळावर आणण्यात यश आलं. या अपघातात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. परंतु, कोस्टगार्डने वेळीची सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

(संग्रहित छायाचित्र)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close