दाभोलकर आणि पानसरेंवर हल्ल्यामागे सूत्रधार एकच -एन.डी.पाटील

February 17, 2015 10:02 PM0 commentsViews:

n d patil17 फेब्रुवारी : डॉक्टर.नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार हेच गोविंद पानसरेंच्या हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केलाय.

तसंच चार दिवसांत हल्लेखोर आणि सुत्रधारांना अटक करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही एन डी पाटील यांनी सरकारला दिलाय.

पानसरेंवर ज्या हल्लेखोरांना हल्ला करण्यासाठी सांगितलं, त्यांच्या मागे कुणाचा हात आहे तो धुर्त असून त्याला पकडलं पाहिजे असं मतही पाटील यांनी व्यक्त केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close