शताब्दीवर दगड फेकणारे अटकेत

September 17, 2009 2:06 PM0 commentsViews:

17 सप्टेंबर राहुल गांधी प्रवास करत असलेल्या रेल्वेवर झालेल्या दगडफेकीचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. पोलसांनी या दगडफेकीप्रकरणी 16 वर्षांच्या दोन मुलांना अटक केली आहे. हा पूर्वनियोजित कट नव्हता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याठिकाणी असलेल्या या दोन मुलांनी रेल्वे येत असल्याचं पाहिलं आणि त्यांनी रेल्वेवर दगड फेकले. पानिपतजवळ ही घटना घडली होती. या मुलांना पानिपतजवळच्या घरोंदा येथून अटक करण्यात आली आहे. बुधवारी याप्रकरणी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.

close