पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ सूटाची बोली तब्बल 1 कोटींवर!

February 18, 2015 11:21 AM0 commentsViews:

78c0d4d3-be9e-4afb-b034-1247529df720wallpaper1

18 फेब्रुवारी :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातलेल्या ‘त्या’ वादग्रस्त सूटाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात मोदींच्या ‘त्या’ सूटाची बोली तब्बल एक कोटींवर पोहोचली आहे. सूरतच्या सुरेश अगरवाला यांनी ही बोली लावली आहे.

मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍यात हा सूट घातला होता. या सूटवर सोनेरी धाग्याने ‘नरेंद्र दामोदारदास मोदी’ असं वीणकाम करण्यात आलं आहे. मोदींनी हा सूट 10 लाखात घातला होता. या सूटवरून देशभर खूप चर्चा झाली होती पण मोदींकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

या सूट बरोबरच पंतप्रधान मोदींना आतापर्यंत मिळालेल्या 445 भेटवस्तूंचाही लिलाव होणार आहे. हा लिलाव आजपासून 3 दिवस चालाणार आहे.

लिलावातून मिळालेली रक्कम नमामी गंगे ट्रस्टला जाणार आहे. यापूर्वीही मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close