पेण मधील सेझवर सोशल ऑडीट

September 17, 2009 2:18 PM0 commentsViews: 4

17 सप्टेंबर रायगड जिल्ह्यातील पेणमधल्या सेझ प्रकल्प येऊ घातलेल्या भागात सोशल ऑडीट करण्यात आलं. महाराष्ट्रात सेझविरोधात लढा देणारे शेकडो आंदोलक यावेळी जमले होते. याआधी सेझविरोधात पेणमध्ये शेतकर्‍यांनी यशस्वी लढत दिली होती. मात्र शासनाने घेतलेल्या जनमत सुनावणीचा निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. सोशल ऑडिटसाठी जमलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी सेझमुळे निर्माण होणार्‍या समस्या आणि तिथल्या लोकांवर होणारा परिणाम याचा आढावा यावेळी घेतला. देशभरातल्या सगळ्याच सेझ प्रकल्पांचं सोशल ऑडिट होणार आहे. त्याची सुरुवात पेणमधून झाली.

close