सात वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या, लोणावळ्यात कडकडीत बंद

February 18, 2015 4:05 PM0 commentsViews:

rape

18 फेब्रुवारी : लोणावळ्यातील हॉटेल कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घडना घडली आहे. एवढचं नाही तर या चिमुरडीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. या घटनेविरोधात लोणावळ्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण आहे.

रायगडमध्यल्या इंदापूर इथे राहणारं एक कुटुंब रविवारी लोणावळ्यात एका लग्नासाठी कुमार रिसॉर्टमध्ये आलं होतं. लग्न समारंभ पार पडल्यानंतर त्यांची सात वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आलं. तिच्या घाबरलेल्या आई वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रारही नोंदवली होती. गायब झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच काल (मंगळवारी) दुपारी पीडित चिमुरडीचा मृतदेह कुमार रिसॉर्टच्या टॅरेसवर आढळला. पोलीस कुमार रिसॉर्टच्या मालकाला पाठीशी घालतायत असा आरोप करत हजारो नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त नागरिकांना लोणावळ्याच्या कुमार रिसोर्टची तोडफोड केली आहे. तसेच तपास अधिकार्याला निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेविरोधात आज लोणावळामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच कुमार रिसॉर्टवर दगडफेकही केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close