दिल्लीत रामदास आठवलेंचं सामान घराबाहेर

September 18, 2009 9:48 AM0 commentsViews: 5

18सप्टेंबर नवी दिल्ली इथल्या रामदास आठवले यांच्या घरातलं सामान बाहेर फेकलं आहे. निर्माण भवनने त्यांना नोटीसा देवूनही घर खाली केले नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीत हरल्यानंतरही त्यांनी बंगला सोडला नव्हता. 8-ए लोधी इस्टेट हा आठवलेंचा बंगला आहे. याकारवाई बाबत रामदास आठवलेंनी सांगितलं की, आपण महाराष्ट्रात काँग्रेसला तगडं आव्हान निर्माण केल्याने केंद्र सरकारने सुडबुध्दीने ही कारवाई केली आहे. मी दलित असल्याने माझ्यावर हा अन्याय झाला आहे. आणि या कारवाई विरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

close