सचिनने लाँच केली BMW i8 हायब्रीड स्पोर्ट्स कार

February 18, 2015 6:43 PM0 commentsViews:

18 जानेवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज मुंबईत BMW i8 हायब्रीड स्पोर्ट्स कार लाँच केली. एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आलेल्या या कारची किंमत तब्बल 2 कोटी 29 लाख इतकी आहे. आज पासूनच ही कार मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कारसोबतचं BMWने आपली नवीन ‘i’ सिरीज भारतामध्ये लाँच केली.

BMW i8 ही हायब्रिड स्पोर्ट्सकारचं डिझाईन अत्याधुनिक आहे. कारचं वजन फक्त 1485 किलो आहे. ही कार पेट्रोल आणि बॅट्री दोन्हीवर चालू शकते तर शहरात गाडी चालवताना जवळपास 40चं मायलेज मिळू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे.

फेरारी आणि लँबॉर्गिनी या हाय एंड स्पोर्ट्स कारस्‌ना टक्कर देण्यासाठी BMWने ही कार लाँच केल्याचं मानलं जातं आहे.

BMW i8 फक्त 4.4 सेकंदांमध्ये 0 वरुन 100 चा स्पीड गाठते, तर तिचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. कारचं इंटिरिअर लेदर आणि क्रोम प्लास्टिकचं बनवण्यात आलं आहे. या कारमध्ये ड्राईव्हर वेगवेगळे ड्राईव्ह मोडही सिलेक्ट करु शकतो. BMWने ही कार फेरारी आणि लँबॉर्गिनी या हाय एंड स्पोर्ट्स कारस्‌ना टक्कर देण्यासाठी लाँच केल्याचं मानलं जातं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close