शिवजयंतीवरून शिवसेनेची पंचाईत!

February 19, 2015 8:56 AM2 commentsViews:

Nilam gohre

19 फेब्रुवारी : शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असली, तरी आता सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेचे मंत्री शासनाच्या निर्णयाप्रमाणे गुरुवारी तारखेने शिवजयंती साजरी करणार आहेत. मात्र  शिवसेना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

राज्याभरात शिवजयंती तारखेनुसार साजरी केली जाते. शिवसेना मात्र शिवजयंती कायम तिथीनुसारच साजरी करते. सनई चौघड्याचा निनाद, ढोल ताशांचा गजर, भव्य मिरवणूक आणि शिवरायांच्या जयघोषात शिवसेना पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करते. आता शिवसेना सरकारमध्ये सामील असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री यावेळी शासकीय शिवजयंतीत सहभागी होणार का, यावरुन पक्षासमोर पेच निर्माण झाला होता. पण शिवसेनेने यावर सोयीस्कर भूमिका घेतली आहे.

दरम्यान, अरबी सुमद्रात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा मुहूर्त हुकला आहे. शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला होणारं भूमीपूजन पुढे ढकलण्यात आलं आहे. पर्यावरण विभागाच्या परवनग्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे शिवस्मारकाचं भूमीपूजन महिनाभर पुढे ढकलण्यात आलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • DATTATRAY JADHAV

  छत्रपति शिवराय हे बहुजनानच्या अस्मितेचे प्रतिक आहे दैवत आहे. जगात कोणत्याही महापुरुषाची जयंती वर्षात दोन वेळा साजरी होत नाही. मग बहुजनांना खिजवण्यासाठी हा शिवरायांच्या जन्म तारखेचा घोळ असावा ना? सरकारी नियमाप्रमाणेच सर्वांनी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करावी.

 • Nativist Raut

  NATIVE PEOPLE’S PARTY : NATIVE VIEWS :

  Bimari aur Ahankar dhire dhire jaati hai.

  Jab kisi ko Ahankar ya Bimari hoti hai to vo ek dam nahi jaati . Shiv Sena ko bhi Chhatrapati Shivaji Maharaj ki Jayanti Tithi ke anusar manane ki Bimari aur Ahankar huva hai. Vo ek dam jaayegi nahi . Log Shivaji Maharaj ko ek itihas purush manate hai . Jin ka itihas duniya ke kai jagah padhaya jaata hai. Shivaj koi poranik ya man gadhant paatr nahi . Aaj saari duniya ka itihas aanter rashtriy vasrsh dwara likha padhaya jaata hai. Jise Shiv Sena ko samaz na hoha . Vo nahi samzenge to log unhe samaza denge . Dhire dhire Shiv Sena dwara manayi jaane wali dusari Shiv jayanti ko bhul jayenge kyu ki vo vevhary nahi nahi uski koi jarurat hai.

  Nv. D.D.Raut , President ,NPP

  Our Message to Nation : Janeu Chhodo , Bharat Jodo

close