तंबाखूवर बंदी घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करणार – दीपक सावंत

February 18, 2015 8:41 PM1 commentViews:

tabacoo

18 जानेवारी :  आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारने आता तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याचे मनावर घेतलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तंबाखू बंदीबाबतच्या कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असून लवकरच कडक कायदा अस्तित्वात आणणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं आहे.

आर. आर. पाटील यांना तंबाखू सेवनामुळेच कर्करोगाचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांचं निधन झाले. राज्यात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता तंबाखू सेवन थांबवण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज असल्याचे दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. त्यासाठी राज्य सरकार नवीन कायद्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही काल (मंगळवारी) IBN लोकमतशी बोलताना तंबाखूच्या व्यसनाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    तम्भखू बिडी सिगरेटे गुट्का हे समन्यांचा विनाश करणारे आहेत . पायरी पायरीने ह्यावर बंधन अनवयास पहिजे. सर्वाप्राथम सर्कारणे ह्यावर जास्तीत जास्त टॅक्स लावयाला पहिजे. समन्यांच्या खीशाला पर्वडनर नाही एव्ढ्या किमती वाढवयाला पहिजे. हेतु हा आहे की समन्यान्ना खरेदी करने मुष्कील झाले पाहिजे म्हणजे गरिबंची तबियत चांगली रहील. सार्कार्ला टॅक्स मीलेल. आणी टो अन्य करनावर खार्च करता येइल.

close