विधानसभा निवडणूकीची अधिसूचना जारी

September 18, 2009 11:44 AM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी अधिसूचना जारी केली. शुक्रवार पासूनच उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली असून 25 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 26 सप्टेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. 29 सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज स्विकारण्याला शुक्रवारपासून सुरवात होत असली तरी अजून मोठ्या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

close