शिवजयंती तिथीनुसारच साजरी करा, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

February 19, 2015 11:23 AM0 commentsViews:

subhash

19 जानेवारी :  पुढच्या वर्षी शिवजयंती तिथीनुसारच साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (गुरुवारी) मुंबईत मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

त्याचबरोबर तिथीप्रमाणे होणार्‍या शिवजयंतीला सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशीही मागणी देसाई यांनी केली आहे.

राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजर केला जात आहे. शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. मात्र, यंदा शिवसेना सत्तेत सहभागी असल्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे शिवसेनेचे मंत्री तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेना पक्ष तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार असल्याचे प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी काल (बुधवारी) स्पष्ट केलं होतं. सरकार तारखेनुसार शिवजयंती साजरी करत असताना सेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते, आता शिवसेना सरकारमध्ये सामील असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close