स्वाईन फ्लू हा ह्रदय आणि फुफ्फुसाचा आजार, महापौरांचा जावईशोध

February 19, 2015 2:19 PM0 commentsViews:

19 फेब्रुवारी :  वातावरणात बदल होत असल्याने स्वाईन फ्लूचा फैलाव होत असल्याचा अजब तर्क मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मांडले आहे. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका मेहनत घेत असून मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा उपक्रमही आम्ही हाती घेतला आहे असा हास्यास्पद दावाही त्यांनी केला आहे.

 मुंबईसह राज्यभरात सध्या स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी बहुधा गांभीर्याने स्वाईन फ्लूचा अभ्यास केला नसावा. वातावरणात एकाएकी उष्णता वाढली की स्वाईन फ्लूसारखे रोग पसरतात असे सांगत त्यांनी स्वतःचे अज्ञान उघड केले. स्वाईन फ्लू हा ह्रदय व फुफ्फुसाचा आजार आहे असेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात स्वाईन फ्लूचा आजार थंडीमुळे बळावतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही मुंबईत जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रकल्प हाती घेत आहोत, यामुळे मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळेल असेही म्हटलं आहे.

महापौर या पदावर असताना शहरातील समस्यांचा अभ्यास असावा किंवा किमान त्या समस्यांची माहिती असावी ऐवढी माफक अपेक्षा या लोकप्रतिनिधींकडून असते. पण दुदैर्वाने महापौर स्नेहल आंबेकर यांनी पुन्हा एकदा निराशाच केली. मिडीयाकडून स्वाईन फ्लू बद्दलचे प्रश्न विचारल्यावर त्यांनी मनात येईल ती उत्तरं ठोकून दिली आहेत. मात्र महापौरबाईंच्या या फेकाफेकीमुळे महापालिकेची नाचक्की झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close