गुहागरचा तिढा सुटण्याची शक्यता

September 18, 2009 11:49 AM0 commentsViews: 2

18 सप्टेंबर गुहागरच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशीही त्यांच्या आधीच इथ दाखल झाले होते. गुहागरची जागा आता सेनेकडे की भाजपकडे यावर आता अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. गुहाहरची जागा सेनेला सोडल्याच्या विरोधात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील भाजपा पदाधिकार्यांनी राजीनामे दिले होते. त्यांनंतर त्यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर हिजागा शिवसेनेला सोडली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आमची नाराजी दुर झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गडकरी आणि मुंडे हे मातोश्रीवर दाखल झाल्याने हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

close