दुष्काळा थांब रे…एकाच कुटुंबात तिघींच्या नशिबी विधवेचं आयुष्य !

February 19, 2015 6:59 PM0 commentsViews:

paithan droughtऔरंगाबाद (19 फेब्रुवारी) : माझा नवरा गेला, दोन सुना विधवा झाल्यात…पोरींना चारं घास मिळावी यासाठी रोजंदारी करतो…गावात पाणी नाही…खायचं काय, कसं जगायचं…आता आमचं कुणी नाही..आम्ही काय करावं ?, ही कैफियत मांडलीये लक्ष्मी पालवे या आजींनी…दुष्काळाच्या दुष्टचक्रात एकाच कुटुंबात तिन्ही महिलांच्या नशिबी विधवेचं आयुष्य आलंय…या तिन्ही महिलांनी हलाखाची या जीवनाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाचा इशारा दिलाय.

मराठवाड्यात दुष्काळामुळे जवळपास सहाशे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. अनेक कुटुंबं उद्‌ध्वस्त झालीत. पैठण तालुक्यातील केकत जळगाव गावात एकाच कुटुंबात तीन महिला विधवा झाल्यात. त्यांच्या घरात आता कर्ता पुरूष नसल्यानं त्याच्या नशिबी वाईट आयुष्य आलंय. लक्ष्मी पालवे यांचा नवरा टीबीमुळं गेला. त्यांच्याकडे टीबीच्या उपचारासाठी पैसे नव्हते, त्यामुळे आपल्या नवर्‍याचा मृत्यू त्यांना डोळ्यादेखत पाहावा लागला. घरातला कर्ता पुरूष गेला. पण नियतीच्या मनात आणखी काही होतं. त्यांची सुन चंद्रभागा पालवे यांच्या नवर्‍यानं विहिरीचं अनुदान मिळालं नाही म्हणून आत्महत्या केली. लक्ष्मी पालवे यांची दुसरी सुन यशोदा पालवे यांच्या नवर्‍यानं नापिकीमुळं आत्महत्या केली. या तिन्ही महिल्यांच्या नशिबी दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे विधवेचं आयुष्य आलं. यशोदा आणि चंद्रभागा यांना दोन लहान मुली आहे. आम्हाला खाण्यासाठीच कसेबसे पैसे कमवतो त्यांचं शिक्षण कसं करणार असा मन हेलावून टाकणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘भाकरीच्या चंद्रासाठी’ जिवनाची हेळसांड होत असल्यामुळे आता या तिन्ही विधवा महिला दोन लहान मुलींसोबत आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचं त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close