मुख्यालय खाली करा, काँग्रेसला केंद्राची नोटीस

February 19, 2015 8:55 PM0 commentsViews:

Congress office_1नवी दिल्ली (19 फेब्रुवारी ) : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मानहाणीजनक पराभवानंतर काँग्रेसला अजून एक झटका बसलाय. केंद्र सरकारने दिल्लीतील ऐतिहासिक काँग्रेस मुख्यालय खाली करण्याची नोटीस पक्षाला बजावली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोट्यात एकच गोंधळ उडालाय.

दिल्लीतील 24 अकबर रोडवर काँग्रेसचं मुख्यालय आहे. गेल्या 46 वर्षापासून याच कार्यालयातून काँग्रेसचा पक्षाचा कारभार चालतो. जानेवारी महिन्यातच नोटीस पक्षाला मिळाली होती. 2013 मध्येच या कार्यालयाच्या भाडेपट्टीचा करार संपुष्टात आला होता. मुदतवाढीवर हे कार्यालय सुरू होतं. कार्यालय खाली करण्याची नामुष्की येवू नये, यावर मार्ग काढण्यासाठी पक्षाचे नेते कायदेतज्ञांशी सल्लामसलत करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close