देशभरात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत 700 बळी

February 19, 2015 10:46 PM0 commentsViews:

swaine flu 2319 फेब्रुवारी : स्वाईन फ्लूचं थैमान काही थांबायचं नाव घेईना. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. तर 11 हजार पेक्षाही जास्त लोकांना लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची एक बैठक घेण्यात आलीये.

बुधवारी गुजरातमध्ये 12 जणांचा बळी गेलेत तर आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 167 बळी गेले आहेत. पंजाबमध्ये 26 बळी गेलेत आणि आणखी तीन जणांना लागण झालीये तर श्रीनगरमध्येही 2 बळी झाल्याचं उघड झालंय. गेल्या दोन दिवसात इथे 3 बळी गेले आहेत. तर धर्मशाळेतही एक मृत्यू झालाय. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्णांची आणि बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये. महाराष्ट्रात नागपूर, मुंबईमध्ये स्वाईन फ्लू पसरत चाललाय. नागपुरात सर्वाधिक 30 जणांचा बळी गेलाय. स्वाईन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील 10 हजार परवानाधारक औषध विक्रेत्यांकडे सरकारने टॅमिफ्लू’ हे औषध विक्रीसाठी उपलब्ध केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close