सुधाकर चव्हाणवर डास मारण्याचाही गुन्हा नाही- राज ठाकरे

September 18, 2009 11:53 AM0 commentsViews: 1

18 सप्टेंबर टाडाफेम सुधाकर चव्हाण याच्या मनसे प्रवेशाचं राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. सुधाकर चव्हाणवर डास मारण्याचाही गुन्हा नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. पण खरोखरच गुन्हे असतील, तर चव्हाणला तिकीट देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारांशी बोलताना असं म्हटलंय. मनसेला एकदा अजमावून पाहा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.

close