बहुचर्चित सुटाच्या लिलावावरून शिवसेनेने केलं मोदींना लक्ष्य

February 20, 2015 10:21 AM0 commentsViews:

samna modi

20 फेब्रुवारी : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटे काढण्यात आला आहे. सामनाच्या पहिल्याच पानावर छापण्यात आलेल्या या कार्टूनमध्ये मोदींच्या बहुचर्चित सूटाच्या करोडोंच्या लिलावाची बातमीचा थेट महात्मा गांधींशी जोडली आहे.

‘एकीकडे देशी खादीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी स्वत: चरखा चालवायचे. पण त्याच गुजरातमधून आलेले मोदी स्वत:च्या नावाचा लाखोंचा सूट बनवून मिरवत आहेत काय आणि टीका झाल्यानंतर त्याच सुटाला तब्बल करोडोंची बोली काय लागते…’ हा असा सगळा विरोधाभास सामनातल्या या कार्टूनमधून मिश्किलपणे रेखाटण्यात आला आहे.

विषेश म्हणजे राज ठाकरेंनी देखील मोदी सरकारला चिमटे काढण्यासाठी कार्टून काढण्याचा नुसता धडाकाच लावला आहे. अशातच आता शिवसेनेच्या सामनामधूनही मोदींना कार्टूनचे फटकारे मारणं सुरू झाल्याने, ठाकरे बंधूंच्या या व्यंगात्मक कलाबाजीवर भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देते याकडे आता सगळ्याचं लक्ष लगलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close