डॉ. दाभोलकरांचे मारेकरी दीड वर्षानंतरही मोकाटच

February 20, 2015 1:44 PM0 commentsViews:

narendra dabholkar20 फेब्रुवारी : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज दीड वर्षे पूर्ण होतं आहे. मात्र हल्लेखोरांना पकडण्यासाठी युती सरकारही अपयशी ठरली आहे. मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी दाभोलकरांची मुलगी मुक्ता दाभोळकर याही यावेळी उपस्थित होत्या.

गोविंद पानसरे यांच्यावर हल्ले करणार्‍यांला आणि दाभोलकरांचे मारेकर्‍यांला लवकरात लवकर शोधच्या मागणीसाठी काही तुरूणांनीही याचं ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे. त्याच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्षे पूर्ण होत असतानाच पाच दिवसांपूर्वी म्हणजेचं मागच्या सोमवारी कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. पानसरे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने पानसरे यांच्यावरील हल्ल्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून, त्यांनाही खुनी पकडण्यात अपयश आले आहे. या घटनेला दीड वर्षे झाल्यामुळे खून करणार्‍यला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close