प्रेमाला नकार दिला म्हणून तरूणीची निर्घृण हत्या

February 20, 2015 5:15 PM0 commentsViews:

kolhapur crimeभंडारा (20 फेब्रुवारी) : प्रेमाला नकार दिला म्हणून एका कॉलेज विद्यार्थीनीची निर्घृण हत्या करण्यात करण्यात आलीये. पवनी तालुक्यातील वलनी गावात ही धक्कादायक घटना घडलीये. शिल्पा जांभूळकर असं या मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. आरोपी देवा गभने पोलिसांना शरण आला असून अटक करण्यात आलीये.

पवनी तालुक्यातील वलनी गावात राहणारी शिल्पा जांभूळकर कॉलेजला जात असताना सकाळी दहाच्या सुमारास हा भीषण प्रकार घडलाय. गावातल्याच देवा गभने या तरुणांन तिचा पाठलाग केला आणि कोयत्यानं गळा चिरुन निर्घृण हत्या केली. आरोपी देवा गभने हा विवाहीत असून, तो गेल्या आठवड्यापासून शिल्पाच्या मागे लागला होता. मात्र प्रेमाला नकार दिल्यामुळं त्यानं चिडून हे कृत्य केल्याचं कबूल केलंय. घटनेनंतर आरोपीनं पोलीस स्टेशनला जावून हत्येची कबुली दिली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली, निलंबन होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close