महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी समीर भुजबळांची साडेतीन तास चौकशी

February 20, 2015 6:07 PM0 commentsViews:

sameer bhujbal 44420 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची आज अँटीकरप्शन ब्युरोकडून साडे तीन तास चौकशी झाली. एसीबीच्या वरळीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. नवी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याचे आरोप समीर यांच्यावर आहेत. सकाळी अकरापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले होते.

काय आहे महाराष्ट्र सदन गैरव्यवहार ?

नोव्हेंबर 2006 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला. 16,000 चौरसमीटर जागेवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनची नवी इमारत बांधण्याचा…डिसेंबर 2006 मध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणीही झाली. के. एस. चमणकर यांना बांधकामाचं हे कंत्राट 52 कोटी रुपयांना देण्यात आलं होतं. मात्र बांधकाम पूर्ण होईपर्यंत याची किंमत 150 कोटीवर पोहचली. कस्तुरबा गांधी मार्गावर उभ्या राहिलेल्या या प्रशस्त इमारतीचं कोडकौतुक होण्याआधीच त्याची कंत्राटं वादात सापडली होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याअंतर्गतच महाराष्ट्र सदनाचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि या संपूर्ण व्यवहारात स्वत: भुजबळ यांच्याच नातलगांना उपकंत्राटं देण्यात आली असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे हा सगळा प्रकार प्रॉफिट ऑफ ऑफिस ??? ऑफिस ऑफ प्रॉफिट???? असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, छगन भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आरोप जर सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन असं भुजबळांनी स्पष्टच करुन टाकलं. पण नातलगांना उपकंत्राटं
मिळाल्याचं मात्र ते नाकारलं नाही.

याना  कंत्राटाचे वाटप

  • के. एस. चमणकर (कंत्राटदार)
  • ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर (भुजबळांच्या सहकार्‍यांची कंपनी)
  • आयडीन फर्निचर भुजबळांच्या सुनांची कंपनी)
  • प्राईम बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स (धनपत सेठ यांची कंपनी)
  • रॉयल एंटरप्रायझेस (धनपत सेठ यांची दुसरी कंपनी)
  • निचे (NICHE) इन्फ्र ास्ट्रक्चर (संचालक: समीर आणि पंकज भुजबळ)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close