वर्ल्डकपचा महासंग्राम आता ‘दूरदर्शन’वरही !

February 20, 2015 6:28 PM0 commentsViews:

world cup dd20 फेब्रुवारी : क्रिकेट वर्ल्डकपच्या महासंग्रामाला धडाक्यात सुरूवात झालीये आणि आता वर्ल्डकपचा थरार ‘दूरदर्शन’वरही अनुभवता येणार आहे. यासंदर्भात आता सुप्रीम कोर्टानेच आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दूरदर्शनवरही वर्ल्डकपच्या मॅचेचा आनंद लुटता येणार आहेत.

वर्ल्डकपच्या प्रेक्षपणाचं स्टार स्पोर्ट्स अधिकृत प्रसारक आहेत. स्टार स्पोर्ट्सची प्रसारणासंदर्भातील याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे आता प्रसार भारतीही केबलच्या माध्यमातून वर्ल्ड कपचे सामने दाखवू शकणार आहे. त्यासाठी प्रसार भारतीला पैसेही मोजावे
लागणार नाहीत. क्रिकेटप्रेमींना भारत-पाकिस्तान मॅच पाहता यावी यासाठी सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या आदेशांना स्थगिती दिली होती. स्टार स्पोर्ट्सने कोट्यवधी रुपये गुंतवल्यानं दूरदर्शनने या मॅचेस दाखवू नयेत, त्यामुळे तोटा होईल,असा दावा स्टारने केला होता. पण हा दावा फेटाळत सुप्रीम कोर्टाने या मॅचेसच्या प्रसारणाचे हक्क प्रसार भारतीलाही दिले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close