यूथ फोरमच्या परिसंवादावरून वाद पेटण्याची शक्यता

February 20, 2015 7:34 PM1 commentViews:

thane parisvandठाणे (20 फेब्रुवारी) : ठाण्यात उद्या होणार्‍या शिवाजी महाराजांवरच्या परिसंवादावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. परिसंवादाचा विषय ‘शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का?’ असा आहे. या परिसंवादातील वक्त्यांना हिंदू संघटनांनी विरोध केलाय तर पोलिसांनी मात्र अद्यापही या कार्यक्रमास परवानगी दिली नाही . दुसरीकडे हा कार्यक्रम होण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय.

मुस्लीम यूथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाचे शत्रू होते का ? या परीसंवादावरून धार्मिक भावना दुखविल्या जाऊ शकतात असं कारण पोलिसांनी पुढे केले आहे. त्यामुळे परवानगी दिली नाही. त्यामुळे या कार्यक्रमावरून मुस्लीम यूथ फोरम आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहे. परिसंवाद व्हावा या साठी फोरम न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असली तरी या परीसंवादातील वक्त्यांना विरोध करत हिंदुत्ववादी संघटनांनी देखील कार्यक्रम होऊ नये या करिता कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतलाय. सर्वसामान्य जनतेला शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजातील नाते समजावे या करिता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते का ? या परिसंवादाचे उद्या संध्याकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,ज्येष्ठ विचारवंत प्रदीप साळुंखे,विद्रोही साहित्य चळवळीचे संस्थापक किशोर ढमाले तसंच अजीज नदाफ हे ठाणेकरांना शिवाजी महाराजांच्या विषयी चर्चेच्या रूपाने समोर येणार आहेत. परंतु या वक्त्यांना ठाण्यातील हिंदुत्ववादी संघटनाणी विरोध करून कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी पोलिसानांकडे केली आहे. तर आयोजक मुस्लीम युथ फोरम यांनी कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान, परिसंवाद व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikram

    MR Jitendra Avhad, in mumbra one youth was mercilessly beaten.. IBN lokmat showed it… Instead of doing these stunts Do something for this youth from mumbra and shirin dalvi.

close