पानसरे यांच्यावर पुढील उपचार मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये

February 20, 2015 8:31 PM0 commentsViews:

govind pansare 44मुंबई (20 फेब्रुवारी ): कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर आता मुंबईमध्ये उपचार होणार आहेत. आज संध्याकाळी त्यांना कोल्हापूरहुन एअर ऍम्ब्युलन्सनं मुंबईला आणलं . पानसरेंवर पुढचे उपचार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी एअर ऍम्ब्युलन्सनं त्यांना कोल्हापूरमधून मुंबईला हलवण्यात आलं.

सोमवारी पानसरे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापूरमधल्या ऍस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. आज 5 व्या दिवशीही त्यांची प्रकृती स्थिर होती. पण राज्य सरकारनं पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानसरे कुटुंबाला मुंबईत उपचार करण्यासाठी विनंती केल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पानसरे यांना मुंबईला हलवण्यात आलंय. दरम्यान, उमा पानसरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर मात्र कोल्हापूरमध्येच पुढचे उपचार केले जाणार आहेत. आज ज्यावेळी पानसरे यांना कोल्हापूरमधून हलवण्यात आलं. त्यावेळी रुग्णालय परिसरात कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close