रेल्वे प्रवाश्यांना विमा संरक्षण नाही

September 18, 2009 1:22 PM0 commentsViews: 3

18 सप्टेंबर रेल्वे प्रवाशांना मिळणारं विमा संरक्षण आता यापुढे मिळणार नाही. रेल्वेने प्रवाशांसाठी असलेली पॉलिसी इन्शुरन्स कंपनीकडून रिन्यू केलेली नाही. रेल्वेच्या म्हणण्यानुसार आता एखादा अपघात झाल्यास नुकसान भरपाई स्वत: रेल्वेतर्फेच देण्यात येईल. भारतीय रेल्वेच्या 10 हजारांपेक्षा जास्त ट्रेन्समधून, प्रवास करणार्‍या पावणे दोन कोटी प्रवाशांसाठी यापूर्वी रेल्वेने 2007-08 मध्ये 34.72 कोटींचा प्रिमियम भरला होता. पण 2008-09 साठी ही पॉलिसी रिन्यू करण्यात आलेली नाही. खोटी केस उभी करून विमा क्लेम करण्याचं प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे. रेल्वेकड आलेल्या क्लेम्सपैकी 90 टक्के दावे खोटे निघालेयत.

close