मोदींच्या ‘त्या’ सुटाचा तब्बल 4 कोटी 31 लाखांना लिलाव

February 20, 2015 9:17 PM0 commentsViews:

modi suit 420 फेब्रुवारी : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूट ‘गंगेला’ मिळालाय. कारण पंतप्रधानांचा हा सूट तब्बल 4 कोटी 31 लाखांना विकला गेलाय आणि हा निधी आता गंगा स्वच्छता अभियानासाठी वापरला जाणार आहे. सुरतमध्ये तब्बल 3 दिवस हा लिलाव सुरू होता अखेर या वादातून मोदींची ‘सुट’का झालीये.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर आले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहुणचार करण्यासाठी कोणतही कसर सोडली नाही. ‘चाय पे चर्चा’, ‘मन्न की बात’ शाही मेजवानी असं बरंच काही मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी केलं. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत उठबस होणार म्हटल्यावर पंतप्रधान मोदींनी सुटाबुटात वावरले. पण त्यांचा एक सूट वादाचा ठरला. ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ अशी अक्षर म्हणजे मोदींचं संपूर्ण नाव असलेला सूट मोदींनी परिधान केला होता. त्यांच्या या सुटामुळे चहूबाजूंनी टीका झाली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्या सुटाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या लिलावातून आलेला पैसा गंगेच्या स्वच्छतेसाठी वापरला जाणार असंही स्पष्ट केलं. अत्यंत गाजलेल्या या सुटाला अखेर सुटेबल मालक सापडला. लालजीभाई पटेल यांनी मोदींचा हा वादग्रस्त सुट तब्बल चार कोटी नव्वद लाखांची बोली लावून विकत घेतलाय. मोदींच्या सुटासाठी मिळालेली ही किंमत गंगा स्वच्छता अभियानासाठी खर्च करण्यात येणार आहे. हिरा आहे की नाही माहित नाही. पण या सुटानं मोदींना चांगलचं अडचणीत आणलं होतं.सुटाची किंमत आणि त्यावर मोदींचं लिहलेलं नाव यामुळे मोदी-ओबामा भेटीनंतर हा सूट हेडलाईन बनला होता. या लिलावामुळे मोदींकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला गेला. पण अजूनही सोशल मीडियावरच्या प्रतिक्रीया मोदीविरोधीच आहेत. त्यामुळे यानंतर मोदी आपल्या फॅशनला आवर घालणार की नवीन स्टाईल घेऊन येणार…याचीच उत्सुकता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close