‘त्या’ दिवशीचा पाक बोटीचा व्हिडिओ प्रसिद्ध

February 20, 2015 11:42 PM0 commentsViews:

Pakistan Boat20 फेब्रुवारी : तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोशली यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने 31 डिसेंबरच्या रात्री पोरबंदरजवळ समुद्रात पकडलेल्या पाकिस्तानी बोटीचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या बोटीचा भीषण असा स्फोट झाला हे व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय. ही बोट स्फोटकांनी भरलेली होती या संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यावर तटरक्षकही ठाम आहे.

मुंबईवर 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी दहशतवादी समुद्री मार्गाने आले होते तसाच पुन्हा एकदा प्रयत्न झाला पण तटरक्षक दलानं हा दहशतवादी हल्ला उधळून लावला होता. पण ही बोट आपणच स्फोट करून उडवून देण्यास सांगितलं होतं. बोटीवरच्या लोकांना पकडून त्यांना बिर्यानी खाऊ घालायची नव्हती, असं खळबळजनक वक्तव्य लोशली यांनी केल्याचं ‘इंडियन एक्सप्रेस’ने म्हटलंय. त्यानंतर आज तटरक्षक दलाने ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचा व्हिडिओच प्रसिद्ध केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close