लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप

February 21, 2015 6:35 AM0 commentsViews:

pansare new img21 फेब्रुवारी : पुरोगामित्वाचा ठेंभा मिरवणार महाराष्ट्रासाठी आजची सकाळी काळवंडलेली ठरलीये. गेले पाच दिवस मृत्यूशी झुंज देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं अखेर निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

16 फेब्रुवारीला कोल्हापुरातल्या घराजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पाच दिवस कोल्हापुरात उपचार केल्यानंतर कालच त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं. पण, रात्री पावणे दहाच्या सुमाराला त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले. पण, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. रात्री पावणे अकरा वाजता त्यांचं निधन झालं.

तासाभरात पानसरे यांचं पार्थिव ब्रीच कँडीमधून जे.जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. पोस्टमॉर्टेम झाल्यावर 6:30 वाजता पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. सुमारे 8 च्या सुमाराला पार्थिव मुंबई विमानतळाला घेऊन जाण्यात येईल. सकाळी 10:30वाजता विशेष विमानाने कोल्हापूरला पार्थिव घेउन जाणार, अशी माहिती जे.जे.हॉस्पीटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

- सकाळी 8 च्या सुमारास पार्थिव मुंबई विमानतळाला घेऊन जाण्यात येईल
– सकाळी 10:30 विशेष विमानाने कोल्हापूर ला पार्थिव घेऊन जाणार, अशी माहिती जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलीये
– कॉ. गोविंद पानसरे यांचं पार्थिव विशेष विमानाने कोल्हापुरात आणल्यानंतर प्रथम दसरा चौक येथे भाकपच्या राज्य अधिवेशनानिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार
– तिथून अंत्ययात्रा निघणार असून पक्षाच्या बिंदू चौक कार्यालयात काही काळ पार्थिव ठेवण्यात येणार
– या ठिकाणी पक्षाचा ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल
– पंचगंगा नदीघाटावर कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येतील
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close