शिवसेना- भाजप युतीचं 169-119 जागांवर अधिकृत शिक्कामोर्तब

September 19, 2009 8:59 AM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर शिवसेना-भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा अखेर शनिवारी रंगशारदामध्ये करण्यात आली. यावेळी 169-119 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालं. याची घोषणा भाजपनेते गोपीनाथ आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली . महत्वाचं म्हणजे गुहागरची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली आहे. तर घाटकोपर पश्चिमची जागा भाजपला देण्यात आली आहे. युतीचा संयुक्त जाहीरनामा लवकरचं घोषित करण्यात येणार आहे. तसंच युतीच्या जाहीरातीही संयुक्त असतील, असं यावेळी सांगण्यात आलं. जागावाटप गुणवत्तेच्या आधारे करण्यात आलं आहे. फक्त गुहागरची जागा याला अपवाद असल्याचं भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी सांगितलं. युतीची घोषणा झाली असली तरी भाजपच्या उमेदवारांची नावं मात्र दिल्लीत जाहीर होणार असल्याचं भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं . तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वत: प्रचारात उतरण्याची आवश्यकता नाही, त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत, असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संागितलं . युतीच्या घोषणे नंतर अनेक ठीकाणी भाजपचे कार्यकर्ते नाराज झाल्याने राजीनामा सत्राला सुरूवात झाली आहे.

close