भारताला डेव्हिस कपच्या जागतिक गटात प्रवेश मिळण्याची शक्यता

September 19, 2009 1:16 PM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर 11 वर्षात पहिल्यांदाच भारत डेव्हिस कपच्या जागतिक गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या टायमध्ये भारतानं 2-0नं आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा अव्वल खेळाडू रिक दे वोस्टने बोपन्नाविरुद्धच्या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली. त्याने पहिला सेट 6-2नं जिंकला. पण मग बोपन्नानं मॅचमध्ये कमबॅक करत दुसरा सेट 6-4नं जिकंला. तिसर्‍या सेटमध्येही बोपन्नानं त्याचा सर्वोत्तम खेळ केला. चौथ्या सेटमध्ये मात्र दोन्ही खेळाडू एकमेकांची सर्व्हिस ब्रेक करत होते. पण बोपन्नानं बाजी मरत आपल्या सर्व्हिसच्या जोरावर मॅच 2-6, 6-4, 6-2, 6-4नं आपल्या खिशात घातली.

close