ऍडमिशन रद्द केल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

September 19, 2009 1:21 PM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर कॉलेजमधील ऍडमिशन रद्द केल्यानं विष प्यायलेल्या पुण्याजवळील मंचर कॉलेजमधल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कॉलेजच्या प्राचार्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. समीर सुदाम मुळे असं या मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याने मंचरच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये बीसीएसाठी ऍडमिशन घेतलं होती. पण तीन महिन्यांनी विद्यापीठाने त्याची ऍडमिशन रद्द केली. त्यामुळे निराश झालेल्या संदीपनं विष घेतलं होतं. त्याच्यावर गेले 10 दिवस उपचार सुरू होते. कॉलेजचे प्राचार्य एस. डी. कांबळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे, तर तोपर्यंत मृतदेहच ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

close