कलावती निवडणूक लढवणार

September 19, 2009 1:23 PM0 commentsViews: 1

19 सप्टेंबर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कलावती बंधुकर विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यांना विदर्भ जनआंदोलन समिती उमेदवारी देणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार आहेत. कलावतींच्या शेतकरी पतीनं आत्महत्या केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी घरी जाऊन कलावती यांची भेट घेतली होती. तसंच लोकसभेतल्या भाषणातही राहुल गांधींनी कलावतींचा उल्लेख केला होता.

close