‘एक बेडरपणाने लढणारा योद्धा’

February 21, 2015 6:13 PM0 commentsViews:

“संबंध लढ्यामध्ये कुठल्याही परिस्थित त्यांनी एक बेडरपणाने लढणारा योद्धा ही प्रतिमा कधीही डागाळू दिली नाही. जेव्हा कधी लाठीकाठी झेलायच्या होत्या तेव्हासुद्धा त्यांनी पुढच्या माणसाचा वार आपल्या अंगावर घेतला. चीनचा ‘लिओ शाऊ’ची या एका कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने ‘हाऊ टू बी ए गुड कम्युनिस्ट’ हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात जे वर्णन केले आहे तसा तत्वज्ञान जगणारा माणूस अशी पानसरेंची ईमेज आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांचं तत्वज्ञान शेवटपर्यंत न्यावे असा ध्यास धरून त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. शाहू महाराजांवर ते 100 व्याख्यानं देणार होते. त्यातील 75 व्याख्याने त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांची तब्येत मधल्या काळात चांगली नव्हती. डोळ्यांनी कमी दिसत होतं, वाचनावर थोडा परिणाम झाला होता आणि तरीदेखील अनंत अडचणी आल्या तरीदेखील आपण कसे सामोरे गेले पाहिजे याचा एक कृतीपाठ, वस्तूपाठ पानसरे स्वत: त्या तर्‍हेचे जीवन जगून त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. बोलावे तसे वागावे, वागावे तसे बोलावे, ही कृती त्यांच्या जीवनात सातत्याने होती. असा एक असामान्य, सहजासहजी न होणारा असा एक नेता आपण दुदैर्वाने गमावलेला आहे, आणि यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा सावरेल ही केवळ बोलण्याची बाब आहे, समाधानाची बाब आहे.”
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close