काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांचा तिढाही सुटण्याची शक्यता

September 19, 2009 1:33 PM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा घोळही शनिवारी सुटण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्याच्या नेत्यांची बैठक शनिवारी दिल्लीत होत आहे. ही बैठक राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी सुरू आहे. 20 वादग्रस्त जागांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण राणे, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, सचिन अहिर हे प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित आहेत. निवडणुका आता तीन आठवड्यांवर आल्या आहेत आणि पितृपक्षही संपल्याने आघाडीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

close