…आता कोण राजीनामा देणार ?, दादांचं इथंही राजकारण !

February 21, 2015 8:17 PM0 commentsViews:

 ajit pawar on pansare321 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर या सगळ्या प्रकरणाचं आता राजकारण सुरू झालंय. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्यावेळेस आमच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. आता कोण राजीनामा देणार असा सवाल अजित पवार यांनी केलाय.

इतकंच नाही तर कॉ.पानसरे यांना एअर ऍम्ब्युलन्सनं मुंबईत आणण्याची घाई नडली, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीये. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही तरमुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावना समजून कोल्हापुरात जायला हवं होतं. पण शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, असंही अजित पवार म्हणाले.

निदान अशावेळेस तरी राजकारणमध्ये आणू नये अशी राज्यातल्या जनतेची अपेक्षा होती. पण लोकप्रतिनिधींना त्याचं भान नव्हतं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close