महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

February 22, 2015 11:57 AM0 commentsViews:

MAHABAND

22 फेब्रुवारी : कॉम्रेड पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या नेत्यांनी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. डाव्या नेत्यांच्या या आवाहनाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आरपीआयनेही पाठिंबा दर्शवला आहे. तर राज्यभरातून या बंदाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

नाशिकमध्ये पानसरेंच्या हल्ल्याच्या निषाधार्थ हुतात्मा चौकातून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात कम्युनिस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बळजबरीने दुकान बंद करताना पोलिसांनी 35 आंदोलकांना ताब्यात घेतलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बंदला पाठिंबा देणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. शेतकरी संघटना आणि रिपाइंनेही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच कोल्हापूर शहरातील सर्व स्तरातील संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचं काल उपचारादरम्यान निधन झालं. पानसरे यांच्या निधनामुळे राज्यभरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी संताप आणि शोक व्यक्त केलाय. दरम्यान पानसरेंचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. मात्र तपास वेगाने सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close