…आणि मेलबर्नवर सचिनने काढला सेल्फी

February 22, 2015 6:13 PM0 commentsViews:

Former Indian cricketer Sachin Tendulkar takes a

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या वर्ल्डकपच्या मेगा मुकाबला सुरू होता आणि अचानक स्टेडियमवर अचानक एकच जल्लोष सुरू झाला… स्टेडियमवरच्या या जल्लोषाचं कारण होतं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर… यंदाच्या वर्ल्डकपचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान टीम इंडियाला चीअर करण्यासाठी मेलबर्नवर उपस्थित होता. सचिनने यावेळी उपस्थित माजी क्रिकेटपटूंशी गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांच्या जल्लोषाला प्रतिसाद देखील दिला. यावेळी सचिनला कदाचित मेलबर्न स्डेडियमवरील आपले दिवस आठवले आणि सेल्फी काढण्याचा मोह सचिनला अनावर झाला. आपल्या मोबाईलच्या कॅमेरात सचिनने स्टेडियमच्या दिशेने सेल्फी टीपला…मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सचिनचा सर्वात मोठा फॅन असलेला सुधाकरही उपस्थित होता. त्याने नेहमीप्रमाणे संपूर्ण शरिरावर तिरंग्याच्या रंगाचा पेंट लावलेला होता. त्यावर मिस यू तेंडुलकर असे लिहिलेलेही होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close