भारताचा डेवीस कपच्या जागतिक गटात प्रवेश

September 21, 2009 9:03 AM0 commentsViews: 5

21 सप्टेंबर दक्षिण आफ्रिकेवर 3-1 ने आघाडी घेत भारतीय टीमने डेव्हिस कपच्या जागतिक गटात तब्बल अकरा वर्षांनंतर प्रवेश केला आहे. डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारतीय टीमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारची डबल्स मॅच गमावल्यामुळे रविवारच्या मॅचमध्ये भारतीय टीमवर विजयासाठी दडपण होतं. या निर्णायक मॅचमध्ये भारताच्या सोमदेव देवबर्मनचा मुकाबला आफ्रिकेच्या रिक दे वोस्टशी होता. सोमदेवने दडपण न येऊ देता खेळ केला आणि ही मॅच 6-7, 7-6, 6-2, 6-4 अशी जिंकली. त्याबरोबर भारतीय टीमने 16 जणांच्या एलिट गटात प्रवेश केला. यापूर्वी लिअँडर पेस आणि रमेश कृष्णन यांच्या उमेदीच्या काळात 1998 मध्ये भारत शेवटचा जागतिक गटात खेळला होता. या स्पर्धेत भारतीय टीमने तीनदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण अखेर टीम उपविजेतीच ठरली होती.

close