नितीश कुमारांनी चौथ्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

February 22, 2015 6:59 PM0 commentsViews:

nitish kumar

22 फेब्रुवारी :  जदयू नेता नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीशकुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतं आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरु होता. या संघर्षाला शुक्रवारी अखेर पूर्णविराम मिळाला. त्यानंतर आज नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी राजभवन येथे नितीश आणि त्यांच्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला नुकताचं राजीनामा दिलेले जितनराम मांझी,लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव आणि ममता बॅनर्जीही उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close