हरिशचंद्राची फॅक्टरी’ जाणार ऑस्करला

September 21, 2009 9:05 AM0 commentsViews: 2

21 सप्टेंबर हरिशचंद्राची फॅक्टरी या मराठी सिनेमाला ऑस्करसाठी पाठवलं जाणार आहे. या सिनेमाची भारतातर्फे ऑस्करसाठी ऑफिशिअल एन्ट्री होत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित हा सिनेमा दादासाहेब फाळकेंच्या चरित्रावर आधारित आहे. नंदू माधव हा या सिनेमात दादासाहेब फाळकेंच्या मुख्य भूमिकेत आहे. तर श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय या संस्थेनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. श्वासनंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा दुसरा मराठी सिनेमा ऑस्करची वारी करतोय. दरम्यान जोगवा सिनेमा न पाहताच हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाची ऑस्करला पाठवण्यासाठी निवड झाल्याचा आरोप, जोगवाचे दिग्दर्शक राजीव पाटील यांनी केला आहे. आय ड्रीम प्रॉडक्शनने जोगवाची निर्मिती केली आहे. जोगवाच्या निर्मात्यांनी प्रिंट न पाठवल्याचं फिल्म फेडरेशनच्या सदस्यांचं म्हणणं आहे.या प्रिंट आपण वारंवार मागितल्यानंतरही त्या पाठवण्यात आल्या नाहीत असही फिल्म फेडरेशनचं म्हणणं आहे.

close