‘बर्डमॅन’ची ऑस्कर भरारी

February 23, 2015 12:24 PM0 commentsViews:

bardman_oscars3323 फेब्रुवारी : ‘अँड द ऑस्कर गोज टू….’ अवघ्या चित्रपटसृष्टीचं लक्ष लागून असलेल्या या घोषणेचा निनाद अखेर झालाय. चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाच्या समजला जाणारा ऑस्कर पुरस्कारामध्ये ‘बर्डमॅन’ने उत्तुंग भरारी घेत गवसणी घातलीये. सर्वोत्कृष्ट पटकथा, चित्रपट आणि दिग्दर्शकाचा बहुमान बॅर्डमॅनने पटकावलाय. तर जुलिआन मूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि एडी रेडमन सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलाय.

ऑस्कर पुरस्काराची गोल्डन ट्रॉफी यंदा कोण पटकवणार याची उत्सुकता अवघ्या जगाला लागून होती. अखेर आज ऑस्करचा नेत्रदिपक असा सोहळा हॉलिवूड चित्रपटाची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला सर्वच प्रसिद्ध कलाकारांनी झोडून हजेरी लावली होती. 87 व्या ऍकडमी पुरस्कारांसाठी खरी चुरस बर्डमॅन आणि बॉयहूड या दोन चित्रपटांमध्ये होती. बर्डमॅनला एकूण 9 नामांकनं मिळाली होती. एकूण 24 गटांमध्ये ऑस्कर पुरस्काराचं वितरण झालंय. पण सर्वांना उत्सुकता होती ती ‘अँड द ऑस्कर गोज टू…’ घोषणेची. अखेरीस ‘बर्डमॅन’ने ‘बॉयहुड’ला मागे टाकत जोरदार भरारी घेत ऑस्करवर आपलं नाव कोरलंय. यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा किताब बॅर्डमॅनने पटकावलाय. एवढंच नाहीतर सर्वोत्कृष्ट पटकथा, चित्रपट आणि दिग्दर्शकाचा पुरस्कारावर कब्जा केलाय. तर ‘स्टिल ऍलिस’साठी जुलिआन मूर ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलीये. ‘द थिअरी ऑफ एव्हरिथिंग’साठी एडी रेडमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बेस्ट कॉश्च्युम डिझाईन ग्रँडचा पुरस्कार ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’या चित्रपटासाठी मिलेना कॅननेरोला मिळालंय. तर बेस्ट मेक-अप आणि हेअर स्टाईलचा पुरस्कार याच चित्रपटासाठी फ्रांसेस हॅनन आणि मार्क कुलिअर यांना मिळालाय. तर फॉरेन लँग्वेज फिल्मचा सन्मान पोलंडच्या ‘इडा’ या चित्रपटाला मिळालंय. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं पुनर्प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे आठ वाजता स्टार मुव्हीजवर होणार आहे.

87वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा

‘बर्डमॅन’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा
ज्युलिअन मूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – (स्टिल ऍलिस)
एडी रेडमेन सर्वोत्कृष्ट अभिनेता – (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)

सर्वात्कृष्ट सहाय्यक अभिनेता – जे.के.सिमन्स (व्हिपलॅश)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मिलेना कॅनोनिरोला (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – फ्रान्सिस हॅनन, मार्क कुलिअरला ऑस्कर
सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमा – इडा (पोलंड)
बेस्ट साऊंड मिक्सिंग – ‘व्हिपलॅश’
बेस्ट साऊंड एडिटिंग : अमेरिकन स्नायपर
सर्वात्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पॅट्रिशिया आर्केट (बॉयहूड)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – जे.के.सिमन्स – (व्हिपलॅश)
बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : इन्टेस्टेलर
बेस्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म : फीस्ट
बेस्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म – ‘बिग हिरो ‘
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल
बेस्ट सिनेमॅटोग्राफी : बर्डमॅन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स -पॉल फ्रँकलिन ( इंटरस्टेलर)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close