काँग्रेसच्या 145 उमेदवारांची नावं निश्चित

September 21, 2009 9:10 AM0 commentsViews: 1

21 सप्टेंबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 145 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. रविवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात ही नावं निश्चित केली गेली. उमेदवारांची नावं मंगळवारी जाहीर केली जाणार आहेत. मुंबई-पुण्यातल्या वादग्रस्त जागांसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीची सोमवारी संयुक्त बैठक होणार आहे. काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक सध्या काँग्रेसच्या मुख्यालयात सुरू आहे. यात उर्वरीत उमेदवारांची नावं निश्चित केली जातील.

close