राष्ट्रपतींनी दिला ‘सबका साथ,सबका विकास’चा नारा !

February 23, 2015 3:08 PM0 commentsViews:

pranab mukharji1

23 फेब्रुवारी : दिल्लीत आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधित केले. ‘सबका साथ, सबका विकास’ हाच केंद्र सरकारचा अजेंडा असल्याचं यावेळी राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या 9 महिन्याचा कामकाजाचा लेखाजोखा आणि आगामी योजना सभागृहासमोर मांडला. बजेट अधिवेशन सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे असं आवाहन यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. विकास करतानाच स्वच्छता राखणे गरजेचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांचा 50 टक्के निधी हा स्वच्छता अभियानावर खर्च करावा असं आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर, प्रत्येकाला अन्न, शहर आणि खेड्यांमध्ये 24 तास वीज यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करत आहे असंही राष्ट्रपतींनी सांगितलंय. केंद्र सरकारची ‘जन धन योजने’च्या माध्यमातून आतापर्यंत 13.2 कोटी खाती उघडली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागाच्या विकासावर जास्त भर असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close